कळत नकळत कधीही असं वाटलं नव्हतं की ज्या वेगानी आयुष्य चालू आहे त्या वेगास एक खंडविराम लागेल. पूर्ण जग जेव्हा कोरोना नावाच्याा एका जिवघेण्या विषाणूशी झुंज देत होतं , तेव्हा तिला आणि मला मिळाला , तो फक्त खूप सारा मोकळा वेळ. तसं तर ती नेहमीच मोकळी होती , सतत मला काही सांगू मागायची . पण माझ्या तीव्र वेगानी चाललेल्या आयुष्याला ती दुरून बघायची . कधी तरी कुठे थोडा वेळ मिळाला कि ती माझी मैत्रिण होयची . आणि जेव्हा मला दिशा नाही दिसायची तेव्हा माझा प्रेरणेचा स्रोत बनून ती माझी सांगाती बनायची . अशी हि माझी पणजी आजी . विजया गजानंद दामले .इतर लोकांना सुचत नव्हतं कि हा लाॅकडाऊन चा काळ कसा जाणार , पण मला मात्र मिळाली होती ती एक संधी . एक अशी संधी जिच्यात मला तिच्या सोबत तिच्या आठवणींचा खजिना बघायला मिळाला .
असं नव्हतं कि तिच्या बद्दल मला काही माहिती नव्हतं , पण मला ह्या वेळेस मला त्या आठवणीं मध्ये खोल जाण्याची संधी मिळाली .तिचा जन्म १२ जानेवारी १९१७ ला महाराष्ट्रातील एका खेडेगावात झाला . तिच्या आई वडिलांची ही पहिली कन्या . तिच्या नंतर तिला अजून चार भाऊ आणि एक बहीण आहे . तिचे वडील त्या काळातले वैद्य होते . परिस्तिथी बेताची असल्या मुळे, ती फक्त तिसऱ्या वर्गा पर्यंत शिकू शकली. वयाच्या १५ व्या वर्षी तिचे लग्न बडोदे येथील गजानंद अनंत दामले यांच्याशी झाले , आणि ती बडोदे येथे आली . ती जरी जास्ती शिकलेली नव्हती पण तिला वाचनात खूप रस होता . हळू हळू संसाराची तारे वरची कसरत करता करता , माझे पणजोबा म्हणजेच गजानंद अनंत दामले ह्यांनी तिला सायकलीन्ग शिकवले . तिला त्या काळात स्पर्धेत उतरवले . आजही जेव्हा मी तिचा आणि त्यांचा जुना फोटो बघते तेव्हा मला खूप अभिमान वाटतो .
अभिमान याचा वाटतो कि ती त्या काळात नऊवारी साडी नेसून सायकलीन्ग करायची . आजच्या जगात जे वूमन एम्पॉवरमेंट म्हण्टलं जात , ते कदाचित आमच्या घरी १९३० पासून चालू झालं होतं.
माझे पणजोबा त्या काळातले खेळाडू होते , ते एक अप्रतिम सायकलिस्ट , बॉक्सर आणि ऍथलिट होते . त्यांनी तिला सायकलिंग शिवाय थ्रोवबॉल , डिस्कथ्रोव , ह्या सगळ्या मध्ये पण पारंगत केले. तिने ह्या सगळ्या खेळांमध्ये खूप सगळी बक्षीस पण मिळवली . तिच्या मध्ये जिद्द तेव्हाही होती आणि आजही आहे . जिद्द आहे की रोज काही नवं शिकायची . त्याकाळी तिने गुजराती भाषा तर शिकलीच पण स्वतःचाच एका मैत्रिणी कडून इंग्रज़ी भाषा पण शिकली . बडोदे येथे भानुमती नावाची संस्था आजही आहे .भानुमती मध्ये बायका लाडू , चिवडा , चकली , असे पदार्थ बनवून विकायचे . त्या संस्थेची ती अध्यक्ष झाली . तिनी किती बेरोजगार बायकांना आत्मनिर्भर बनायचं शिकवलं पुढे जाऊन ती रम्मी आणि ब्रिज शिकली . बडोदें येथे लेडीज क्लब आणि हिंद विजय जिमखानाची मेंबर झाली . ब्रिज जो एक खूप अवघड बुद्धीचा पत्त्याचा खेळ आहे त्याची ती नॅशनल चॅम्पियन झाली .आज तिला एकदम कोरोना आणि लहान असताना आलेल्या प्लेग बद्दल आठवले .
तिनी मला सांगितलं की , खूप लोक मरत होती , सगळ्याच घरात उंदीर असल्या मुळे सगळे तंबू बांधून राहत होते . त्या वेळेस ती खूप लहान होती म्हणून तिला जास्ती काही आठवत नाही . सध्याच्या कोरोना मुळे , तिला आधी थोडी भीती वाटली पण जेव्हा तिने स्वतः वर्तमानपत्रात सगळं वाचलं तेव्हा आता ती निवांत आहे . आज तिचं वय १०३ आहे, गेल्या काही वर्षात तिचे कधी हाड तुटले , फ्रॅक्चर झाले , कधी खूप तब्येत बिघडली . पण ह्या सगळ्यात हुन पण ती आज उभी आहे , ते फक्त तिचा इचछाशक्ती मुळे .आज ही जेव्हा कधी काही कठीण प्रसंग येतो तेव्हा मला तिच्यातलं तेच स्पोर्ट्समन स्पिरिट दिसत ,जे कदाचित त्या काळी होतं .आजही ती रोज लवकर उठते , देवाच नाव घेते , पूर्ण वर्तमानपत्र अगदी तपशील वाचते . ह्या आठवणीं चा खजिना उघडला .आम्ही जुने फोटो बघितले , आम्ही रोज संध्याकाळी कॅरम आणि पत्ते खेळतो . ती आणि मी आम्ही खवैये असल्या मुळे , मी वेगळे वेगळे पदार्थ बनवते आणि तिला खाऊ घालते . कधी कधी आम्ही सोबत नाचतो पण . म्हतारपण पण बालपण असता , त्या मुळे आम्ही चाॅकलेट आणि बिस्कीट लपवतो आणि कोणी नसताना सोबत खातो . कधी तरी नूडल्स , पास्ता , पाणीपुरी ह्या सगळ्याची मजा घेतो .अशी ही आहे आमची लाॅकडाऊन स्टोरी .
TRANSLATION
103 Not Out
Never had I ever imagined that the speed with which life was going will get ellipsis marks. When the whole world was battling with a deadly virus called Coronavirus, at that time what we got in our hands was time. Lots of free time to spend. She was always free, constantly trying to express something to me. But she preferred to see my fast-paced life from a distance. Whenever I got free time, she became my friend. Whenever I didn't get direction, she became my source of inspiration and guided me in my hard times. She is my Panjiaaji (great grandmother). Mrs. Vijaya Gajanand Damle.When everyone was figuring out how this lockdown will pass, I got an opportunity. An opportunity in which I got to see a treasure trove of her memories with her.
It wasn’t that I didn’t know anything about her, but this time I had the opportunity to go deeper into those memories. She was born on 12 January 1917, in a village in Maharashtra. She is the first daughter of her parents. She is survived by four brothers and a sister. Her father was a physician. Due to the low financial situation, she was only able to learn up to the third grade. At the age of 15, she married Gajanand Anant Damle of Baroda, and she came to Baroda. Although she was not well educated, she was very interested in reading. Gradually, coping up with the new married life and household chores, my Panajoba (Great Grandfather), Gajanand Anant Damle, taught her cycling. At that time, she competed in various cycling competitions. Even today, when I look at her and her old photos, I feel very proud. Proud, because she used to wear a “Nauvari” sari (traditional nine yards saree) and go cycling.
The present-day term women empowerment was already started at our place in the 1930s.
My Panjoba (great grandfather), was an amazing cyclist, boxer, and athlete. Apart from cycling, he also mastered her throwball, disc throw. She also won a lot of prizes in all these games. I always feel that her stubbornness has been seen ever since then. She always wants to learn something new every day. At that time she not only learned Gujarati but also learned English from one of her friends.
There is an organization called Bhanumati in Baroda, even today. In Bhanumati, women used to make and sell food like Laddu, Chivda, Chakli. She became the president of that organization. She taught unemployed women how to become self-reliant.
She even learned rummy and bridge. She became a member of Ladies Club and Hind Vijay Gymkhana at Baroda. And further became the national champion of one of the toughest mind games of the card known as the bridge. Today, when we are going through Corona, she suddenly remembers the plague epidemic that affected, when she was a child. She told me that a lot of people were dying, there were rats in every house, and that is why everyone was living in tents. She was very young at the time so she doesn't remember much. When she heard the first time, that this kind of deadly virus is affecting a lot of people, she was devastated. She was feeling upset, but somehow I managed to counsel her about it and later she read details in the newspaper and she felt calm after it.
Today, she is 103 years old. In the last few years, she had broken bones, fractures, and very poor health sometimes. But in all this, she is standing today, only because of her willpower. Today, whenever there is a difficult situation, I see the same sportsman spirit in her, which was probably seen in her then. Even today, she gets up early every day, worships god, reads the whole newspaper in detail.
A treasure trove of these memories opened up. We looked at old photos, we play carom and cards every evening. Since she and I are foodie, I make different delicacies and feed her. Sometimes we dance together. Old age is just like childhood, we hide chocolates and biscuits and eat together when no one is around. Sometimes she even enjoys noodles, pasta, panipuri with me. We are cherishing each and every moment together. I feel blessed I got her in my life.
This is our lockdown story.
Khup ...sunder Marathi.....and inspiring story..👌👌👌👌 touch wood aaji...ashyach ..aanandi and enthusiastic Raha..👍
ReplyDeleteKhup ...sunder Marathi.....and inspiring story..👌👌👌👌 touch wood aaji...ashyach ..aanandi and enthusiastic Raha..👍
ReplyDelete