लॉकडाऊन आणि मी

Picture of girl in front of photo booth of wings
२४ मार्च २०२०. मी नुकतीच दोन दिवसापूर्वी बडोद्यावरून परत आले होते. तिकडे मी माझं शिक्षण पूर्ण करतीये “ह्यूमन डेव्हलपमेंट एंड फॅमिली स्टडीज” मध्ये. त्या दिवशी रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदीजी पूर्ण देशाला काही संदेश देणार होते. मी, आई, बाबा आणि आजोबा पूर्ण लक्ष देऊन टी. व्ही. नावाच्या लक्ष वेधून घेणाऱ्या डब्ब्या समोर बसलो होतो. तेवढयात नरेंद्र मोदी ह्यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. ते ऐकल्या ऐकल्या माझ्या मनात एकच प्रश्न आला, आता अवघे २१ दिवस करायचं तरी काय मी घरी बसून?घराबाहेर पाउल पण टाकता येणार नाही का? ह्या लॉकडाऊन मध्ये नक्की काय काय करू शकतो? आणि काय बिलकुलही नाही करू शकणार? असे प्रश्न सतत डोक्यात भोवऱ्यासारखे फिरत होते. 

मी माझ्या परीक्षेसाठी अभ्यास चालू करायच ठरवलं. पण माझं अभ्यासात काही लक्ष लागत नव्हतं. आता नेमकं करावं तरी काय? हा प्रश्न घेऊन मी आई बाबांकडे गेले. ते म्हणाले की अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तुला घरी बसून करण्यासारख्या. मी स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यावर खूप मनापासून काम करावयाचं ठरवलं. ते मी आज पर्यंतही जिद्दीने, मनापासून, नियमितपणे करते, सकाळी आणि संध्याकाळी. ह्याच बरोबर मी, आई आणि आजी कडून स्वयंपाकही शिकले जो मला आधी जमायचा नाही. जसे २१ दिवस संपायला आले, तशी मी खूप खुश झाले पण आतून कुठेतरी वाटत होते की लॉकडाऊन वाढणार, कारण केसेस आणि मृत्यू वाढतच जात होते. मी आजून  अनिश्चित कालावधी पर्यंत घरी रहायच्या तयारीत होते. 

ह्या वेळेत मी दोन ऑनलाईन कोर्सेस केले. त्यात माझे दिवसाचे चार पाच तास सहज जायचे आणि व्यायाम तर सोबतीला होताच. आजपर्यंत म्हणजेच ३० मे पर्यंत लॉकडाऊन चालूच आहे. दोन महिने उलटून गेलेत, पण आता घरी बसायची सवयच झाली आहे. कधी काही बाहेरची छोटी कामे असतील तेव्हा, किंवा शनिवार–रविवार आजीकडे जायचे असेल तेव्हाच बाहेर पडते. बाकी सबंध वेळ घरीच असते. आम्ही, म्हणजे मी, आई आणि बाबा नेटफ़्लिक्स वर डॉक्यूमेंटरीज, सिनेमे व सिरीज बघतो. हा लॉकडाऊन चालू झाल्यापासून माझी जीवनशैलीच बदलली आहे. आधी पेक्षा १००% चांगली झाली आहे असे वाटते. ह्या काळात, आधी वाटलेला तेवढा कंटाळा नाही आला, पण घरी बसून, कामे करून, घरच्यांशी गप्पा मारून, वेगळीच मजा येते. आता २ महिन्यात पूर्ण वेळ घरी बसून मी काय शिकले? 

१) मी स्वतंत्र पणे सर्व काम करू शकते.  
२) आयुष्यात छोटे मोठे बदल करणं वाटतं तेवढं बिलकुल अवघड नसतं.
३) जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानून घ्यायचं असतं.
४) २४ तास हातात फोन न ठेऊन, सोशल मीडियाचा कमीत कमी वापरही करता येतो.
५) मित्र मैत्रिणीँची खूप आठवण येत असतानाही, आपण त्यांना न भेटता २ महिने नक्कीच राहू शकतो.
मला स्वतःबद्दल ह्या सर्व गोष्टी “लॉकडाऊन सिरीज” मध्ये  कळाल्या.
तुम्ही काय काय शिकलात? विचार केलात का? नसला केलात तर नक्की करा. तुम्हालाच त्यात आनंद मिळेल.

TRANSLATION
THE LOCKDOWN AND I

24TH MARCH 2020. 
I had just returned from Vadodara, being there to complete my bachelor’s degree in Human Development and Family Studies. I was excited to be back and spend time with my family and friends, unaware of the intensity of the Corona Virus. On that very day, 24th March, our Prime Minister was going to address the nation at 8pm. My mom, dad, grandfather and me sat glued to the television. He announced a 21 day nationwide lockdown. As soon as I heard this, my mind was besieged with numerous questions. An uncertainty loomed large over my conscience.What would I do sitting at home all day for this long a period? Will I not be able to even step out of the house? What would the restrictions be? And what would be completely prohibited? 

I finally decided to start preparing for my university examinations. But, with all these happenings, I was distracted. What next? I took this question to my parents and expressed myself. “There are so many things that you can do sitting at home” they said. I thought very sincerely on what they had discussed with me and decided to stringently work on my physical fitness. I follow that routine till date with full rigour, motivation and dedication.Alongside this I honed my culinary skills tutored by my mother and grandmother, something that I was bad at earlier. As the 21 day lockdown period came to its end, I was happy but somewhere within I knew that this would be extended seeing the rate at which the cases and deaths had peaked.

 I was mentally prepared to stay at home for an unknown period of time in which along with my physical exercises, I also completed two online courses devoting 4-5 hours for them. Till date, the lockdown is still in its full steam. It has been two months, but now I am just used to sitting at home. Sometimes I go out and do essential shopping or visit my grandparents over the weekend. That’s about it! My parents and I watch a fair amount of documentaries, series and movies on Netflix. Since the lockdown, my lifestyle has definitely improved. 100% better. In these tough and demanding times, I definitely did not get as bored as I had anticipated. On the contrary, I felt much better and happier to have been able to spend so much time with my family. In these two months, I achieved a lot.

1. I have become quite independent in my thinking and actions.
2. I am now convinced that in life, making small adjustments is not that big a deal.
3. You should always be happy and content in whatever you have.
4. It is possible to stay away from luring technology and social media. Something that I can call SOCIAL MEDIA DETOX.
5. You can surely stay for a protracted period without meeting your friends and dear ones.

I got to know myself better in these “LOCKDOWN SERIES.”
What about you? Do you share the same sentiments? If so, do share! 
Shivangi Thakkar

Just a gregarious lass who likes to play with words.

Post a Comment

If you have any queries, you can contact us.

Previous Post Next Post